Corona Virus : भारतात आढळले विषाणूचे बाधित २८ रुग्ण

Update: 2020-03-04 08:50 GMT

चीनच्या वुहान प्रांतातून सुरु झालेला कोरोना वायरस (Corona Virus) जगभर थैमान घालण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. भारतातही या विषाणूचे २८ सदोष रुग्ण आढळल्याची माहिती केंद्रिय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली आहे. तर जगभरात कोरोना विषाणूने ३००० हून अधिक बळी गेले असून ९०,००० हून अधिक सदोष रुग्ण आढळले आहेत.

भारतातील कोरोना विषाणूच्या सदोष २८ रुग्णांमध्ये केरळमधील तीन रुग्ण आहेत. ज्यांना गेल्या महिन्यात उपचारानंतर सोडण्यात आलं होत. उर्वरित २५ रुग्ण या आठवड्यात आढळले आहेत. या रुग्णांपैकी ..

-दिल्लीतील ४५ वर्षीय रुग्ण असून ते युरोपातून आले आहेत.

-हैद्राबादमधील २४ वर्षीय तंत्रज्ञ जो दुबईहून परतला आहे.

-आग्रा येथील ६ रुग्ण ज्यांना दिल्लीमधील रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर विषाणूचा प्रदुर्भाव झाला.

-१६ इटालीयन पर्यटकांचा समूह ज्यांनी उत्तरप्रदेशमधून राजस्थान आणि नंतर आग्रा येथे प्रवास केला होता.

या सर्व रुग्णांना विशेष देखरेखीत ठेवण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री हर्ष वर्धन (Dr. Harsha Wardhan) यांनी पत्रकार परिषदेत दिली. इथून पुढे परदेशातून भारतात येणाऱ्या प्रत्येक भारतीय आणि परदेशी नागरिकांची स्कीनींग केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी भयभीत न होता आपली दैनंदीन जीवनात स्वच्छतेचे पालन करावेत. तसेच ताप किंवा इतर सामान्य आजार असल्यासही आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे सुचवले आहे.

Similar News