‘मंदिर बनतेही कोरोना देश से भागेगा…’

Update: 2020-07-30 00:56 GMT

5 ऑगस्टला अयोध्येत पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिराचे भुमीपुजन होणार आहे. पण देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदीवस वाढत असताना मंदिरापेक्षा एखादं रुग्णालय बांधाव अशी मागणी काही लोक करत आहेत. या वरुन आरोप प्रत्यारोप सुरु असतानाच यात आता भाजपच्या एका महिला खासदानाने “राम मंदिर बनताच करोना देशातून हद्दपार होईल” असं म्हणत सहभाग घेतला आहे.

दौसा लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असलेल्या जसकौर मीना या विधानामुळे चर्चेत आल्या आहेत.”आम्ही आध्यात्मिक शक्तीचे पुजारी आहोत. आध्यात्मिक शक्तीप्रमाणेच चालतो. मंदिर तयार होताच करोना देशातून पळून जाईल,” असं जसकौर मीना यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या आधी साध्वी प्रज्ञा सिंह यांनी सुध्दा अशाचं प्रकारचं विधान केलं होतं.

Similar News