CoronaVirus: ‘या’ सुंदर मास्कची श्वेता महालेंना पडली भुरळ

Update: 2020-03-26 06:44 GMT

राज्यातील कोरोनाबाधितांच्या (CoronaVirus) संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. नागरिकांना सतत सुरक्षेसाठी आणि विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून मास्क वापरण्याचे आदेश दिले जात आहे. भाजप आमदार श्वेता महाले (Shweta Mahale) यांनी आपल्या ट्वीटर हॅंडलवरून काही गावकऱ्यांचा फोटो शेअर केला आहे. ज्यांची कोरोनाच्या संकटापासून वाचण्यासाठी काढलेली युक्ती आपल्यासाठी फारच प्रेरणादायी आहे.

एकीकडे राज्यात मास्कचा तुटवडा निर्णाण झाला असताना उपलब्ध साधनांमध्ये संकटावर मात कशी करावी याचा एक उत्तम दाखलाच चिखली वासियांनी दिला आहे. मुंबई पुणे या शहरी भागांमध्ये विषाणूचा फैलाव अधिक प्रमाणात होतो आहे. मास्कचा तुटवडा निर्माण झाला की लगेच नागरिकांमध्ये तणाव निर्माण होतो.

शहरातील शिक्षीत नागरिकांनाही लाजवेल अशी कल्पना या आदिवासी बांधवांनी कोरोनापासून स्वत:चं रक्षण करण्यासाठी काढली आहे. निसर्गानं भरभरुन दिलेल्या वैभवाचा योग्य वापर करुन आयुष्य जगण्याचा सुंदर मार्ग यांनी दाखवला आहे.

Courtesy : Social Media

श्वेता महाले यांनी फोटो शेअर करताना आपण ज्यांना अशिक्षीत समजतो ते खरे शिक्षीत आहेत. उपलब्ध असलेल्या साधनांचा उत्कृष्ट उपयोग करणं हे आदिवासीं शिवाय कोणीच करू शकत नाही. हे आपल्यासाठी प्रेरणादायी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

देशभरात कोरोना व्हायरस ला हरवण्यासाठी 21 days lockdown पाळला जातोय. या संकट काळात नागरिकांना सतत घरात राहण्याची, स्वच्छता राखण्याची, तोंडाला मास्क लावण्याची विनंती केली जात आहे. मात्र, या सूचनांचं पालन होताना दिसत नाहीय. परिणामी कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतेय.

Similar News