तमाशा कलावंताचं हातावर पोट असतं. सध्या देशात कोरोनो मुळे अनेक उद्योग बंद ठेवण्यात आले आहे. गर्दी करणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्याचा परिणाम तमाशांवर देखील झाला आहे. त्यातच सध्या यात्रांचा कालावधी असल्यामुळे तमाशा कलावंताचं मोठं नुकसान होणार आहे. मात्र, असं असलं तरी कोरोनो ने घातलेल्या थैमानामुळे राज्य सरकारने घेतलेल्या बंदी निर्णयावर आम्हा तमाशा कलावंतांचा कुठलाही आकस नाही. राज्य सरकारने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. असं मत तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना व्यक्त केलं आहे.