बेपत्ता कोरोनाबाधित वृद्ध महिलेचा मृतदेह सापडला शौचालयात

Update: 2020-06-11 02:28 GMT

जळगाव कोविड रुग्णालयात कोरोना बाधीत बेपत्ता वृद्ध महिलेचा आठ दिवसानंतर मृतदेह शौचालयात सापडला. जळगावच्या शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आलाय.

भुसावळ येथील कोरोना झाल्याने 80 वर्षी वृद्ध महिला 1 जूनला जळगावच्या शासकीय रुग्णालयात उपचार साठी दाखल झाली होती, मात्र 2 जून पासून ही महिला कोविड वार्ड मध्ये आढळून आली नाही, कुटुंबीयांनी अखेर पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. पत्रकारांनी पालकमंत्री तसच जिल्हाधिकाऱ्यांना बेपत्ता महिला बाबत प्रश्न विचारला होता, महिलेचा शोध सुरू असल्याचं पत्रकारांना सांगण्यात आलं. मात्र, काल सकाळी सदर महिलेचा कोरोना वार्डच्या शौचालयात तब्बल आठ दिवसांनी मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ह्या घटनेवरून जळगावच्या कोविड रुग्णालयात बधितांवर उपचार बाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

आरोग्य विभाग तसच जिल्हा प्रशासनाच्या भोंगळ काराभरामुळेच जळगाव जिल्हयाचा मृत्युदर अधिक आहे.

उपचारातून वाचणारा रुग्णही मृत्यूच्या दाढेत जातोय अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

दरम्यान सदर घटना गंभीर असून चौकशी करण्याचे आदेश देऊन दोषींवर कारवाही करण्यात येईल असं जळगाव जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिलीय.

जळगाव कोरोना वार्डात उपचारासाठी आलेल्या अनेक तक्रारी नागरिकांनी जिल्हाप्रसासन, पालकमंत्री, आरोग्यमंत्री गृहमंत्र्यांना वारंवार देऊनही सुधारणा होत नसल्याने जळगाव येथ कोरोना रुग्णांची संख्या बाराशे पर्यंत पोहचली आहे, आणि त्यात रोज सातत्याने वाढत आहे. तसच मृत्यूदारात ही वाढच हॊत आहे.

Similar News