राज्यात कोरोना बाधितांची संख्या शंभर पार

Update: 2020-03-24 05:12 GMT

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ५०३ वर पोहोचली असून महाराष्ट्रातही रुग्णांचा आकडा १०१ झाला आहे. साताऱ्यात १ आणि पुण्यात ३ नवीन रुग्णांची नोंद झालीय. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या ९७ वरुन १०१ वर पोहोचली आहे. दरम्यान कोरोनाने ३ रुग्णांचा बळी घेतला असून हे रुग्ण मुंबईतील आहेत.

राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता नागरिकांना घरात बसून राहण्याचं आवाहन केलं जातंय. ३१ मार्च पर्यंत ही संचारबंदी लागू असून परिस्थितीचा आढावा घेत आवश्यकता असल्यास संचारबंदी पुढे कायम केली जाईल.

 

Similar News