चीननंतर करोना विषाणूचा सर्वाधिक फटका आता अमेरिकेलाही बसला आहे. न्यूयॉर्क शहरात आता चीनमधील करोनाचं प्रमुख केंद्र ठरलेल्या वुहान प्रमाणे परिस्थिती निर्माण झाली आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी आता न्यूयॉर्कमधील लाखो लोकांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
यामुळे जवळपास सात कोटी लोकांना घरातच थांबावे लागत आहे. न्यूयॉर्क आणि इलियॉन्समध्ये हे निर्बंध लागू करण्यात आलेत. इथंही अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकान बंद ठेवण्यात आली आहेत.
अमेरिकेत आतापर्यंत ७ हजारांच्यावर लोकांना करोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत २३० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या न्यूयॉर्क शहरातच करोनाची लागण झालेले सुमारे ५ हजार रुग्ण आहेत.