कोरोनाबाधित महिलेने दिला जुळ्या बाळांना जन्म

Update: 2020-05-28 13:37 GMT

राज्यात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत असताना काही सकारात्मक घटनांनी लोकांच मनोधौर्य वाढते आहे. मुंबईतील सायन रुग्णालयात आज एक महिन्याच्या बाळाने कोरोनावर मात केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही हॉस्पीटलमधील आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले. त्यानंतर आता पुन्हा अशीच एक दिलासादायक घटना अहमदनगरमध्ये घडली आहे.

अहमदनगरमध्ये एका कोरोनाबाधित महिलेने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात या महिलेचे सिझरियन करण्यात आलं असून या महिलेने एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे दोन्ही बाळांची आणि मातेची तब्बेत ठीक असल्याचे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

दोन्ही बाळांचे वजन २ किलो इतके आहे. मुंबईहून निंबलक येथे आलेली ही महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. आज सकाळी साडेअकरा वाजता तिने या जुळ्यांना जन्म दिला.

Similar News