तस्लिमा नसरीन यांना जेव्हा मुस्लिम टॅक्सी चालक भेटतो

Update: 2019-06-28 09:03 GMT

वादग्रस्त लेखिका म्हणून तस्लिमा नसरीन यांचं नाव नेहमी चर्चेत असतो. देशामध्ये झुंडबळीचे (#MobLynching) शिकार २०१५ पासून आजपर्यंत ९४ आहेत. नुकतीच झारखंडमधील खारसावन जिल्ह्यात जय श्रीराम म्हणण्याची सक्ती करत जमावानी मारहाण केली. या मारहाणीत 24 वर्षीय तबरेज अन्सारीचा मृत्यू झाला. तसेच ठाण्यातील मुंब्रा भागात एका टॅक्सीचालकाला मारहाण झाली. अश्या घटना देशात घडत असताना तस्लिमा नसरीन यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक ट्विट केलं आहे. यामध्ये उबरच्या टॅक्सी चालकासोबतचा हा संवाद आहे. यांसंदर्भात त्यांनी टॅक्सी चालकाजवळ साधलेला सवांद-

तस्लिमा नसरीन - तुझे नाव काय?

टॅक्सी ड्राइवर -ताहिर खान

तस्लिमा नसरीन -तू कुठे राहतोस?

टॅक्सी ड्राइवर – ओखला

तस्लिमा नसरीन – तुला आत्तापर्यंत एकाने तरी जय श्रीराम म्हणायची सक्ती केली?

टॅक्सी ड्राइवर – कधीच नाही

तस्लिमा नसरीन -तुला मुस्लीम म्हणून देशात सुरक्षित वाटते का?

टॅक्सी ड्राइवर – हो

तस्लिमा नसरीन -आत्तापर्यंत तुला एखाद्या वाईट प्रसंगाला सामोरं जावं लागलं का?

टॅक्सी ड्राइवर – नाही

तस्लिमा नसरीन – तू कुणाला मत दिलं?

टॅक्सी ड्राइवर मोदींना

तस्लिमा नसरीन -तुला घरासाठी निधी मिळाला का?

टॅक्सी ड्राइवर -होय, ३ लाख रूपये मिळाले

हा सवांद त्यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे.

https://twitter.com/taslimanasreen/status/1144284050745516032

 

 

 

 

Similar News