परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आणि त्याची भरपाई करून द्यावी अशी विनंती अनेक नेत्यांनी सरकारकडे केली आहे. खासदार नवनीत राणा यांनी स्वत: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. नुकसान भरपाई संदर्भात पत्र लिहले आहे. तसेच हे पत्र राज्य शासनाला सुपूर्त करण्याचे आवाहन केले.
“परतीच्या पावसामुळे अमरावती जिल्हयासह विदर्भातील शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे शेतीमधील सर्वच पिकं, सोयाबीन, ज्वारी, कापुस, मका, तीळ, उडीद, संत्री, पालेभाज्या आणि फळं इत्यादी पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांवर फार मोठे संकट आले आहे.
म्हणून ओला दुष्काळ जाहीर करुन तातडीने झालेल्या नुकसानाचे पंचनामे करुन सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत मिळावी” असेही या पत्रात लिहिले आहे.