सध्या देशावर कोरोना व्हायरस चं (CoronaVirus) संकट आहे. या संकटाचा सर्वाधिक फटका देशभरातील मजूर वर्गाला बसला आहे. हाताला काम नसल्यामुळे मुंबई, दिल्ली सारख्या शहरांमधून मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत कामगारांना आपल्या गावी जायचं आहे. नुकतंच सुरत आणि मुंबईत या मजूरांमधील तणाव दिसून आला आहे.
- CoronaVirus : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 2916, पाहा तुमच्या जिल्ह्याची संख्या किती?
- 'आरश्यात स्वतःच्या नजरेला नजर देता येतेय का?', रुपाली चाकणकरांचा सवाल
मंगळवारी मुंबईतील वांद्रे (Bandra Migrants) येथे कामगारांचा जमाव झाल्यानंतर तो पांगवताना पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला होता. या प्रकरणाला राजकीय वलय प्राप्त झाल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील मतभेद समोर आले आहेत.
- उद्धव ठाकरेंवर टीकेप्रकरणी कंगणाच्या बहिणीला नेटकऱ्यांनी झोडपले..
- 'मुंबईचं इटली होणार, योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या खंबीर नेतृत्वाची गरज'
या प्रकरणातील मजूरांना झालेल्या त्रासानंतर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी “नेहमीच प्रत्येक संकट गरीब आणि मजूरांवरच का येते? त्यांची स्थिती लक्षात घेऊन निर्णय का घेतले जात नाहीत? त्यांना देवाच्या भरवशावर का सोडलं जात?” असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) विचारला आहे.
लॉकडाऊन च्या काळात रेल्वे टिकीटांची बुकींग का चालू होती. मजुरांसाठी स्पेशल ट्रेनची व्यवस्था सरकारने का नाही केली. मजूरांकडे आता पैसे संपले आहेत. घरातील धान्यही संपलंय, अशा स्थितीत त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होते आहे. म्हणून त्यांना आपल्या गावी जायचं आहे. अशी व्यथा प्रियांका गांधी यांनी मांडली आहे.
अजूनही योग्य योजनेसह त्यांच्या मदतीची व्यवस्था केली जाऊ शकते. मजूर वर्ग या देशाच्या पाठीचा कणा आहे. असं म्हणत प्रियांका गांधी यांनी नरेंद्र मोदींना या मजूरांना देवासाठी मदत करण्याची विनंती केली आहे.