महाराष्ट्रातील भाजपा सरकारविरोधात विरोधी पक्षांकडून निदर्शनं

Update: 2019-11-26 13:30 GMT

महाराष्ट्राच्या राजकारणात मंगळवारी एक वेगळंच वळण पाहायला मिळालं. अजित पवार यांनी आधी उपमुख्यमंत्रिपदाचा व त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्याचबरोबर आज महत्व्याची घडामोड म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय देत उद्या म्हणजेच २७ नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी घेण्याचा आदेश भाजपला दिला होता. मात्र त्यानंतर दुपारी अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. दरम्यान महाराष्ट्रातील भाजपा सरकारविरोधात विरोधी पक्षांकडून निदर्शनं करण्यात आले. भाजपकडून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मदतीने महाराष्ट्रात स्थापन करण्यात आलेल्या सरकाराच्या विरोधात यावेळी विरोधी पक्षांकडून निदर्शने देखील करण्यात आली.

Similar News