शिकत असताना कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यात 10 वी चा टप्पा हा फार महत्वाचा असतो. माझ्या साठी हा तितकाच महत्वाचा ठरला. खर तर 10 वी पर्यंत घरच्या काही अडचणींमुळे माझ्या शिक्षणात खूप अडचणी आल्या होत्या. मला शिक्षण ही सोडून द्यावे लागले होते. जेव्हा 10 वी च वर्ष आले तेव्हा इतर जशी पालकांची अपेक्षा असते तशीच माझ्या ही पालकांची होती परंतु त्यांनी त्या गोष्टींचा अट्टाहास धरला नाही. मला अजूनही आठवत आहे ज्या दिवशी निकाल होता त्या दिवशी मला खूप भीती वाटतं जर नापास झाले तर पुढे काय? पण माझ्या मोठ्या भावाने मला सकाळी एक गोष्ट सांगितली की नापास झाली तरी चालेल घाबरु नकोस, जर नापास झालीच तर त्या गोष्टीला एक अनुभव म्हणून पाहा आणि पुढे चाल, त्या एका वाक्याने मला जो काही आत्मविश्वास दिला तो आजपर्यंत आहे. आणि नेहमी प्रमाणे मी बऱ्या मार्कानी पास झाले. आयुष्यात पुढे जाण्यासाठी आपल्याला फक्त मार्क्सच महत्वाचे नसतात तर त्या बरोबर महत्वाचा असतो तो आपल्यात असलेला आत्मविश्वास याची प्रचिती मला माझ्या १० वी च्या वर्षात आली. आणि आज माझं स्वतःच एक ऑफिस आहे. जर हा आत्मविश्वास जर मला तेव्हा भेटला नसता तर कदाचित आज मी जिथे आहे तिथे नसते.
योगिता सुर्यवंशी