महाविकास आघाडीच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजनेला आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राज्यात ठिकठिकाणी सुरुवात करण्यात आली. मुंबई उपनगर, पुणे, नाशिक, बुलडाणा, सोलापूर, वाशिम यांसह अनेक ठिकाणी शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली. राज्यात जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांनी योजनेचा शुभारंभ केला. रायगड जिल्ह्याचे पालकमंञी आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त अलिबाग येथे शिवभोजन थाळी' या योजनेचे उद्धाटन केले.
https://twitter.com/iAditiTatkare/status/1221398285107073025?s=20