मुंबई मेट्रो रेल काँरपोरेशनतर्फे मेट्रो – 3 साठी डिझाइन प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेसाठी देशाच्या विविध भागातील स्पर्धक सहभागी झाले होते आणि असंख्य प्रोजेक्ट मधुन आर्किटेक्ट श्रेया गवस हीच्या प्रोजेक्टची निवड करण्यात आली आहे.
12 तज्ञांच्या निवड समितीने सर्वोत्कृष्ट प्रोजेक्ट म्हणुन क्षेया गवस हिची निवड केलेली आहे तिच्या या अभुतपुर्व यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे श्रेया ही मोहन गुनाजी गवस याची कन्या असुन दोडामार्ग - पिकुळे गावाचे रहिवासी तथा माजी प्रशासकीय अधिकारी व सिडको सल्लागार म्हणुन मोहन गुनाजी गवस यांना ओळखले जाते.
मुंबई शहरामधील वाढती जागेची समस्या व वाहतुकीचे अडथळे तसेच वाढती लोकसंख्या यांवर उपाय योजना करणे गरजेचे आहे आणि म्हणुनच एमएसआरसी मुंबई शहरात मेट्रोचे जाळे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे प्रकल्पाअंतर्गत येणारी मेट्रो व आजुबाजुचा परिसर कसा असावा तंत्रज्ञानाचा वापर करुन कोणत्या अद्ययावत सुविधा असणे आवश्यक आहे या सर्व गोष्टींचा आभ्यासपुर्वक आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत प्रस्ताव विविध शैक्षणिक संस्था व आर्किटेक्ट यांच्याकडुन मागविण्यात आला होता.
श्रेया गवस हीने मुंबई विद्यापीठातुन 2017 साली आर्किटेक्टची प्रथम श्रेणी संपादीत केली होती आणि आता ती मास्टर आँफ आर्किटेक्टच्या शेवटच्या वर्षामध्ये आहे आर्किटेक्ट श्रेया गवस ही दोडामार्ग - पिकुळे गावाची सुकन्या आहे श्रेयाच्या मेट्रो -3 प्रोजेक्टच निवड समितीने भरभरुन कौतुक केल श्रेयाच्या प्रोजेक्ट मध्ये सुचविलेला प्रस्ताव व सुचना या मेट्रो- 3 स्टेशन तयार करताना लक्षात घेतल्या जाणार आहेत.
12 तंग्ज्ञाच्या समितीद्वारे अंतिम फेरामध्ये फक्त 19 प्रोजेक्टची निवड करण्यात आली होती त्यानंतर प्रोजेक्टच्या संबधित आर्किटेक्टना मुंबईमधील बी.के.सी येथे बोलवुन प्रोजेक्टचे सादरीकरण करण्यात आले या सर्व स्पर्धकांमधुन श्रेया गवस हीने सादर केलेल्या सादरीकरणाला सर्वोत्कृष्ट प्रोजेक्ट म्हणुन निवडसमितीने निवड केली तसेच 22 नोव्हेंबरला मुंबई बी.के.सी येथील एमएमआरसी सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये श्रेया गवस हीला सन्मानित करण्यात येणार आहे.