प्रौढांच्या तुलनेत लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी

Update: 2020-03-12 12:27 GMT

जगभर पसरलेल्या कोरोना वायरसच्या (Corona) दहशतीत एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. या महितीनुसार प्रौढांना होणाऱ्या कोरेना विषाणूच्या तुलनेत लहान मुलांमध्ये विषाणूची लागण कमी प्रमाणात झालीय. असे चिनी आरोग्य अधिका-यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार समोर आलय. एकिकडे जगभरातुन कोरोना वायरसमुळे शाळा बंद होत आहेत तर, दुसरीकडे मुले कोरोना व्हायरसपासून वृद्धांइतके गंभीर आजारी होत नाहीत असं दिसून आलय.

कॅलिफोर्निया विद्यापीठातील साथीचे रोगशास्त्रज्ञ आर्थर एल. रेनगोल्ड यांच्या मते मुलांना हृदयरोग, फुफ्फुसांचा आजार किंवा इतर परिस्थितींचा त्रास होत नाही. त्यामुळे त्यांना कोरोना व्हायरसपासून आजारी पडण्याची लक्षण कमी असु शकतात. दररोजच्या खेळातून त्यांची रोगप्रतिकारक शक्ती ही वाढलेली असते.

जगभरात मृत कोरोनामुळे मृत व्यक्तींमध्ये पन्नाशी पार केलेल्या किंवा श्वसनाचे विकार असलेल्या वृद्ध व्यक्तींची संख्या सर्वाधिक आहे. आर्थर हे जीवशास्त्र विभागांचे विभाग प्रमुख आहेत आणि त्यांनी राष्ट्रीय पातळीवर तसेच जगातील असंख्य विकसनशील देशांसमवेत संसर्गजन्य रोगांच्या प्रतिबंधांसाठी संशोधन केलय.

Similar News