मुख्यमंत्री साहेब मग आम्ही घरातच मरायचं का? चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल
“मुख्यमंत्री साहेब तुम्ही आमचे पालक आहात. आमच्या संरक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे. कोविड केअर सेंटरमध्ये महिलेवर अत्याचार होत असतील, तर तुम्हीच स्पष्ट करा महिलांनी उपचारासाठी कोविड सेंटरला जायचं की घरीचं मरायचयं.” ही प्रतिक्रीया आहे भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांची.
राज्यात कोविड सेंटरमधील महिलांवरील वाढत्या अत्याचारांवर संताप व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी ‘आम्ही कोविड सेंटरमधील SOP जाहिर करण्याची मागणी वेळोवेळी करतोय पण मुख्यमंत्री त्याकडे का लक्ष देत नाहीत.’ असा प्रश्न देखील वाघ यांनी उपस्थित केला आहे.