जपानमध्ये हाय हिल्सच्या विरोधात मोहीम

Update: 2019-06-11 09:41 GMT

काही दिवसांपूर्वी तामिळनाडू सरकारने महिलांनी साडी किंवा सलवार-कमीज किंवा चुडीदार व ओढणी परिधान करून कामावर यावं, असा आदेश काढला आहे. त्यामुळे संपूर्ण महिलावर्गात नाराजी व्यक्त झाली. पण आता जपानमधील कंपन्यांनी असाच एक फतवा काढला आहे. जपानमधील महिलांनी कामाच्या ठिकाणी हाय हिल्स घालणे हे बंधनकारक केले आहे. जागतिक लैंगिक समानतेची यादी नुकतीच प्रकाशित झाली. त्यात १४९ देशांमध्ये जपानचा ११० वा क्रमांक आहे.तरी देखील अशी विषमतेवर आधारित बंधन लादली जातात.त्यामुळे महिलांनी #KuToo ही मोहीम सुरू केली.

• नेमकं काय घडलं? मोहीम कशी सुरु झाली?

जपानमधील कंपन्यांनी एक नवा नियम काढला. खरंतर हाय हिल्स मुळे पायांना त्रास होतो ,पाय दुखतात, चालायला जमत नाही असा बऱ्याच समस्या निर्माण होतात.त्यामुळे युमी इशिकावाने त्या विरोधात सोशल मिडियावर #KuToo मोहीम सुरू केली.

युमी इशिकावा ही अभिनेत्री आणि लेखिका आहे.युमी यांनी अठरा हजार लोकांच्या स्वाक्षऱ्या घेतलेल्या.तिला सोशल मिडियावर चांगलाच प्रतिसाद मिळाला.#KuToo हा जॅपनीज शब्द आहे. kutsu म्हणजे शुज आणि kutsuu म्हणजे त्रास,दुखणे यावरून हा हॅशटॅग तयार झाला आहे.सरकारकडे याबद्दल याचिका दाखल केली.पण कामगार मंत्री टाकुमी नेमोटो यांनी याचिका फेटाळली.नेमोटो यांच्या मते,हाय हिल्स नियम योग्य आहे आणि महिलांना या नियमांचे पालन करावे. आधुनिक काळात तरी महिलांनी कोणत्या प्रकारचे पादत्राणे वापरवे की कपडे घालून कामावर यावे यावर चर्चा होतात,नियम केले जातात.त्यामुळे खरंच आधुनिक काळ सुरू आहे का? हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो.

https://twitter.com/tictoc/status/1136945962897879043

Similar News