नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात आंदोलन सुरु आहेत. या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर विरोधक एकत्र असल्याची चर्चा देखील आहे. यामध्ये राहूल गांधी,प्रियांका गांधी आणि आता काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या कायद्याचं उद्दिष्ट भारतीयांमध्ये धार्मिक आधारावर फूट पाडणं हे आहे, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली आहे. शनिवारी दिल्लीमध्ये काँग्रेस कार्यकारी समितीची बैठकपार पडली. या बैठकीत त्यांनी सांगितलं की, "काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते समानता, न्याय आणि सन्मानासाठी सुरु असलेल्या या लढ्यात जनतेसोबत आहेत." त्याचबरोबर त्यांनी जेएनयू आणि अन्य ठिकाणी विद्यार्थी आणि तरुणांवर सुरू असलेल्या हल्ल्याच्या घटनांची चौकशी समिती नेमण्याची गरज असल्याचे सांगितले.