जागतिक पोलिस क्रीडा स्पर्धेत बुलडाण्याच्या मोनाली जाधवचा विक्रम , दोन सुवर्णांसह तीन पदकांची कमाई

Update: 2019-08-23 06:12 GMT

बुलडाणा :- चीनमध्ये झालेल्या जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील मोनाली जाधवने विक्रम करत दोन सुवर्णांसह एकूण तीन पदकांची कमाई केली आहे. भारतीय पोलीस दलाचे प्रतिनिधीत्व करत असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील जलंब पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत महिला कॉन्स्टेबल मोनाली हर्षचंद्र जाधव हिने तिरंदाजीमध्ये विक्रमी कामगिरी नोंदविले टार्गेट आर्चरी'मध्ये ७२० पैकी ७१६ गुण मिळवित दोन सुवर्ण पदक व एक कांस्य पदक मिळविले आहे.

मोनालीची संघर्षगाथा

मोनाली जाधव ही २०१३ मध्ये पोलीस दलात भरती झाली असून ती बुलडण्यामधील आनंद नगर येथील राहवासीं असून ती जिल्ह्यातील आंतरराष्ट्रींय खेळाडू आहे. बुलडाण्यासारख्या साधारण शहरात आणि गरीब कुटुंबात राहणारी मोनाली बारावीत असताना तिच्या वडिलांचे अपघाती निधन झाले.सध्या ते जलंब पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत आहे.

चीनच्या चेंगडू येथे ८ ते १८ आॅगस्ट दरम्यान जागतिक पोलीस क्रिडा स्पर्धा झाल्या. यामध्ये मोनालीने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधले. फिर्ल्ड आर्चरीमध्ये सुवर्ण, तर 'थ्रीडी' आर्चरी प्रकारात कांस्य पदक मिळविले.असून मे महिन्यात शांघाय येथे झालेल्या विश्व स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करीत जागतिक स्तरावर नववे स्थान मिळविले होते. मोनाली जाधवला तिरंदाजी प्रशिक्षक चंद्रकांत इलग,सुरेश शिंदे यांचे मार्गदर्शन, तसेच पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रोत्साहन मिळाले.

मोनालीच्या या यशाबद्दल बुलडाणा जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.दिलीप भुजबळ पाटील यांनी त्याचे अभिनंदन केले.तर बुलडाणा जिल्ह्यातून मोनालीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.मोनालीने विभाग ते राष्ट्रीय स्तरावर आपल्या प्रशिक्षकांचे डावपेच आणि कुशल बुद्धिमत्तेने प्रथम क्रमांक पटकावत अनेक पदकांची कमाई केली.

https://youtu.be/MuX5o1diX0w

प्रतिनिधी , निखिल शाह, बुलडाणा

 

 

 

 

Similar News