अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प मांडताना करदात्यांना कही खुशी कही गम दिल्याचं दिसून येतं. 2020-21 च्या अर्थसंकल्पात कर रचनेत काही बदल केले आहेत.
नवीन कर रचनेतील बदल पुढील प्रमाणे आहेत.
वार्षिक उत्पन्न | नवीन कर |
2.5 ते 5 लाख | 05 लाख ( आधीही 5 लाखचं) |
7.5 ते 10 लाख | 15 टक्के (आधी 20 टक्के) |
10 ते 12.5 लाख | 20 टक्के (आधी 30 टक्के) |
12 ते 15 लाख | 25 टक्के (आधी 30 टक्के) |
15 लाखांपेक्षा | जास्त 30 टक्के (कोणतीही सवलत नाही) |
तर नवीन कंपन्यांसाठी कॉर्पोरेट टॅक्स 15 टक्के असणार आहे. त्यामुळं सरकार नवीन कंपन्यांना प्रोत्साहन देताना दिसून येत आहे.
भाषणाच्या सुरुवातीलाच निर्मला सितारमण यांनी भारतात गेल्या 2 वर्षांत 60 लाख नवीन करदाते तयार झाले असल्याची माहिती सांगत देशातील इन्स्पेक्टर राज संपवण्यात सरकारल यश आल्याची माहिती दिली. देशातील बँकिंग व्यवस्थेत मोठी सुधारणा झाली अशी माहिती देखील सितारमण यांनी यावेळी दिली.