प्रेयसीच्या घरच्यांकडून प्रियकराचा खून

Update: 2020-02-06 08:49 GMT

प्रेयसीच्या घरात घुसून लपून बसलेल्या तरुणाचा तिच्या घरच्यांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा घटना बुलडाणा जिल्ह्यात घडलीये. याप्रकऱणी पोलिसांनी त्या मुलीच्या घरातील ८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ज्ञानेश्वर देवेन्द्र घिवे असं या तरुणाचं नाव असून तो ३२ वर्षांचा होता.

या तरुणाचे लग्न झाले होते आणि त्याच्या घरासमोरच राहणाऱ्या एका तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या तरुणीचे लग्न ७ फेब्रुवारी म्हणजे शुक्रवारी होणार आहे. दरम्यान ४ फेब्रुवारी च्या रात्री ८.३० वाजेच्या दरम्यान ज्ञानेश्वर दिवे हा युवक प्रेयसीच्या घरात लपून बसलेला आढळला.

त्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी त्याला कुऱ्हाडीच्या दांड्याने बेदम मारहाण केल्याचा आरोप ज्ञानेश्वरचे वडील देवेंद्र घिवे यांनी दिलाय. या प्रकरणातील सर्व आरोपी सध्या फरार आहेत.

Similar News