बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे सोशल मिडीयावर सतत अक्टीव्ह असतात. ट्विटरवरूनही ते आपली मत आणि कविता चाहत्यांसमोर मांडत असतात. नुकतंच त्यांनी स्त्रियांबाबत एक ट्विट केलं आहे. या ट्विटला नेटीझन्सचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय.
या ट्विटमध्ये अमिताभ बच्चन यांनी ‘सासरचे लोक आपल्या सूने प्रती करत असलेला दुजाभाव समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचं हे ट्विट खूप व्हायरल होत आहे. तसेचं लोकही त्यांच्या या विचारांना मोठ्या उत्साहात प्रतिसाद देत आहेत.
त्यांनी म्हटलं आहे की, “लोक नेहमी म्हणतात की, “ही आहे आमच्या घरची सुन. पण असं कधीच म्हणत नाहीत की, हे घर आमच्या सुनेचं आहे.” बीग बींच्या या ट्विटला काही लोकांनी कमेंटमध्ये सहमत असल्याचं सांगितलं तर काही विरोधही दर्शवला आहे.
T 3522 - लोग अक्सर कहते हैं : "और ये है , हमारी घर की बहू "
ये नहीं कहते की : "और ये घर हमारी बहू का है " !
— Amitabh Bachchan (@SrBachchan) October 18, 2019