राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.टी. पवार यांच्या स्नुषा भारती पवार यांना यंदा भाजपतर्फे दिंडोरी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेली आहे. 2014 साली त्यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. त्या नाशिक जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत तसंच राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षही व प्रवक्त्याही होत्या. विकासाच्या मुद्द्यावर त्या राजकारण करू इच्छितात. भाजपात प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीला निवडणुकांमध्ये चांगलाच फटका बसणार आहे.