माजी भाजप आमदार नरेंद्र मेहता (Narendra Mehta) यांच्यावरील बलात्कार प्रकरणाच्या आरोपावरुन भाजप आणि राष्ट्रवादी पक्षातील महिला नेत्यांमध्ये दात दाखवण्याच्या टोल्यावरुन चांगलीच जुंपली आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकनकर आणि भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यात ट्वीटर वॉर सुरु झालंय. यात नेटीझन्सही आपल्या जोरदार प्रतिक्रिया देत आहेत.
संबंधित बातमी..
भाजप माजी आमदार नरेंद्र मेहतांवर बलात्काराचा गुन्हा दाखल
रुपाली चाकनकर (Rupali Chakankar) यांनी आपल्या ट्वीटर हॅंडलवरून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या पक्षाच्या या विकृती आपल्या भाजपचे संस्कार दाखवतात.. का येथे ही क्लिन चीट देणार..?” असा सवाल उपस्थित केला. सोबतच, या ट्वीटमध्ये त्यांनी चित्रा वाघ यांना “आपण शांत का? खायचे दात एक अन दाखवायचे दात एक...” अशी खोचक टीका केली.
विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis साहेब आपल्या पक्षाच्या या विकृती आपल्या @BJP4Maharashtra चे संस्कार दाखवतात..का येथे ही क्लिन चीट देणार..?
.
.@ChitraKWagh आपण शांत का ? खायचे दात एक अन दाखवायचे दात एक... pic.twitter.com/kbd0BFsXxS
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) February 29, 2020
या टीकेवर चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनीही रुपाली चाकनकर यांना दात सांभाळण्याचा सल्ला देत, “ज्याने गुन्हा केला असेल त्याला त्याची शिक्षा मिळेलचं नेत्यांच्या चुकींचं समर्थन मी या आधीही केलं नाही आणि आताही करत नाही. भाजप चुकीच्याचे समर्थन कधीचं करणार नाही” असं प्रतिउत्तर दिलं.
पुढे त्यांनी “पोलिस कारवाई करतीलचं तुमचे दात जास्तचं दिसताहेत ते सांभाळून ठेवा कधी घशात जातील याचा नेम नाही.” असा इशाराच दिला आहे.
ज्याने गुन्हा केला असेल त्याला त्याची शिक्षा मिळेलचं नेत्यांच्या चुकींचं समर्थन मी या आधीही केलं नाही आणि आताही करत नाही @BJP4Maharashtra चुकीच्याचे समर्थन कधीचं करणार नाही पोलिस कारवाई करतीलचं तुमचे दात जास्तचं दिसताहेत ते सांभाळून ठेवा कधी घशात जातील याचा नेम नाही @Dev_Fadnavis https://t.co/6kGVDcp3zZ
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 29, 2020
चित्रा वाघ यांनी दिलेलं उत्तर आणि दात घशात जातील या इशाऱ्याला रुपाली चाकनकर यांनी त्य़ांच्या पक्षबदलावर निशाणा साधलाय. “आमच्या दाताचे आणि घशाचे विषय किरकोळ आहेत, आपण ज्याच्यासाठी पक्षातून उडी मारलीत तेवढंच आठवा, आजही पळता भुई कमी होईल... हिशोबात. झाकली मूठ सव्वा लाखाची..” असं ट्वीट त्यांनी केलंय.
आमच्या दाताचे आणि घशाचे विषय किरकोळ आहेत,आपण ज्याच्यासाठी पक्षातून उडी मारलीत तेवढंच आठवा,आजही पळता भुई कमी होईल....हिशोबात.
.
.
झाकली मूठ सव्वा लाखाची..#दलबदलू @ChitraKWagh @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) February 29, 2020
या ट्वीटवर पुन्हा चित्रा वाघ प्रतिउत्तर देणार की, ‘झाकली मुठ सव्वा लाखाची’ योग्य मानून घेणार हे पाहणं म्हत्त्वाचं ठरणार आहे.