‘रेप इन इंडिया’ या आपल्या वादग्रस्त विधानावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी अशी मागणी भाजपने केली आहे.आज काँग्रेसनं नवी दिल्ली रामलीला मैदानावर ‘भारत बचाव’ मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. ‘पार्टी चा नेता भारतातील महिलांचा बलात्कार व्हायला पाहिजे. हे राष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा घडत आहे. कॉंग्रेस पार्टीचा नेता बलात्कारासारख्या मोठ्या गुन्हाचं राजकारणाचा भाग करत असेल. हे देशात पहिल्यांदाच घडत आहे. गांधी खानदानाचा एक मुलगा उघडपणे म्हणत आहे. भारतात बलात्कार करा. शा आशयाचं जोरदार आणि आक्रामक भाषण स्मृती इराणी यांनी लोकसभेत केलं आहे.
यावर मनसे महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्षा आणि मनसेच्या माजी नगरसेविका रुपाली पाटील ठोंबरे यांनी
‘रेप इन इंडिया’ ये वक्तव्य कोण बोललं काय बोललं यापेक्षा या प्रश्नावरती सरकारने काय करायला हवं हे लक्षात घेतले पाहिजे. अश्या बलात्कारांच्या प्रश्नांवर भाजप सरकारने काय सुविधा करायला हवं हे शोधणं महत्व्याच आहे. जर या प्रश्नाचे केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी या राजकारण करत असतील तर त्यांचा निषेधच असेल. महिलांच्या प्रश्नाचं सरकारने गांभीर्याने विचार करायला हवं
अशी प्रतिक्रिया रुपाली पाटील यांनी दिली.
https://youtu.be/x9V5ObX4WDw