यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी मिळाली नाही परंतु पक्षाशी बंडखोरी न करता त्यांनी उमेदवारी मिळालेल्या चंद्रकांत दादा पाटील यांना पाठिंबा दिला त्यामुळे ते निवडूनही आले.
परंतु आज मेधा कुलकर्णी चक्क महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या भेटीला आल्या होत्या. यामुळे त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले परंतु ही भेट कोणत्याही राजकीय कारणासाठी नसून मेधा कुलकर्णी यांच्या मुलीच्या लग्नाच्या निमंत्रणासाठीची होती हे स्पष्ट झाले आहे.
यावरूनच पक्ष जरी वेगळा असला तरी त्यामध्ये सलोख्याचे मैत्री संबंध असतात हे दिसून येते.