‘विश्वास ठेवा आपल्या कोयत्याला न्याय नक्कीच मिळेल’ ऊसतोड कामगारांना पंकजा मुंडेंचे आश्वासन
लॉकडाऊनमुळे (lockdown) सहकारी साखर कारखाने बंद असल्याने त्याचा फटका ऊसतोड कामगारांना बसला. आर्थीक दृष्ट्या त्यांचे हाल होत आहेत त्यांना आधार मिळावा याकारीता पंकजा मुंडे (pankaja munde) प्रयत्नशील आहेत. अशी माहिती पंकजा यांनी ट्टवीटरच्या माध्यमातून दिली आहे.
'माझ्या ऊसतोड मजूर बांधवांच्या न्याय मागण्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, (uddhav thackeray) जेष्ठ नेते शरद पवार साहेब,(sharad pawar) कारखानदारांचे प्रतिनिधी जयंत पाटील, (jayant patil) साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी विश्वास ठेवावा. आपल्या कोयत्याला न्याय नक्कीच मिळेल. तथापि, कोयत्याची धार आणि सन्मान सांभाळण्याची जबाबदारी ऊसतोड कामगार आणि मुकादमांवर देत आहे.' असं पंकजा यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
कोयत्याला मिळेल न्याय; ऊसतोड कामगारांनी विश्वास ठेवावा. खा.शरद पवार साहेब, जयंत पाटील, दांडेगावकर चेअरमन साखर कारखाना संघ यांच्याशी चर्चा करणार.@PawarSpeaks @Jayant_R_Patil
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 6, 2020
देशात अचानक झालेल्या लॉकडाऊनच्या काळात ऊसतोड कामगारांचे मोठे हाल झाले होते. कामानिमित्त घरापासून दूर असलेले हे कामगार राज्याच्या विविध भागांत अडकले होते. उघड्यावर संसार थाटण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. त्यावेळीही पंकजा मुंडे यांनी त्यांच्या दुरावस्थेकडे सरकारचे लक्ष वेधले होते.