बीडमध्ये पुन्हा हत्याकांड, पतीनेच केली दोन मुलांसह पत्नीची निर्घृण हत्या
लॉकाडाऊन च्या काळात कौटुंबिक अत्याचारांचं वाढतं प्रमाण फारचं चिंताजनक आहे. बीड मध्ये आईसह तिच्या दोन मुलांचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपी चा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत. संगीता संतोष कोकणे ( वय ३१ ), संदेश संतोष कोकणे ( अंदाजे वय १०), मयूर संतोष कोकणे (वय ७ ) अशी मृतांची नावे आहेत.
बीड शहरातील शुक्रवार पेठ भागात भर दुपारी संगीता कोकणे या महिलेची आणि तिच्या दोन मुलांची निघृण हत्य़ा करण्यात आली होती. आई आणि एका मुलाला दगडांनी ठेचून मारण्यात आलं होतं तर दुसऱ्या मुलाला पाण्याने भरलेल्या बॅरलमध्ये बुडवून मारण्यात आलं होतं.
हे ही वाचा...
- भाजप आपल्या पापांनीच मरत आहे, रुपाली पाटील यांचा आक्रमक टोला
- ‘एकवेळ माझा गळा चिरा पण..’,आंदोलनकर्त्यांना ममता बॅनर्जींचं भावनिक आवाहन
- टॉप १० कोरोनाबाधित देशात ‘या’ देशाने मिळवलं मृत्यूंवर नियंत्रण
यामागे पोलिसांना महिलेचा पती संतोष कोकणे याच्यावर संशय होता. संगीता कोकणे, संदेश कोकणे या दोन्ही माय लेकाचे मृतदेह एका खोलीत रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला.
बीड पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना माहिती मिळताच ते घटना स्थळी दाखल झाले आणि त्यांनी तात्काळ तपास सुरु केला. गेल्या अनेक दिवसांपासून घरात कौटुंबिक वाद सुरू होते. याच वादातून पतीने तिचा खून केल्याचा अंदाज पोलिसांना होता. अखेर पोलिसांनी दट्या दिल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केल्याचं पोलिस निरिक्षक विश्वास पाटील यांनी सांगितलं.
दरम्यान, आठवड्यात जिल्ह्यातील तिहेरी हत्याकांडाची ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वीच मांगवडगाव (ता.केज) येथे शेत जमिनीच्या वादातून तिघांची हत्या झाली होती.