2019च्या लोकसभा निवडणुकांसाठी पहिला-दुसरा टप्पा पार पडला आहे. बीडच्या खासदार आणि उमेदवार प्रितम मुंडे या पुन्हा एकदा निवडणुकींच्या रिंगणात उतरल्या असून पुन्हा एकदा बाजी मारणार का हे तर येणारा वेळच सांगेन. बीडच्या खासदार प्रितम मुंडे यांच्या राजकीय प्रवासासंदर्भात जाणून घेऊयात..
भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या खासदार प्रितम मुंडे या व्यवसायानं डॉक्टर आहेत. त्यांनी एमबीबीएस सोबतच डर्माटॉलॉजीमध्येही एम.डी केलं आहे. वडिलांच्या निधनानंतर 2014 साली बीड मतदारसंघातून वडिलांच्या जागी त्या भाजपतर्फे उभ्या राहिल्या आणि प्रचंड मतांनी त्या निवडूनही आल्या. देशात सर्वाधिक म्हणजे सुमारे सात लाख मतं मिळवणा-या उमेदवारांपैकी एक आहेत. 2014 साली त्या बीड मतदारसंघातून निवडून आल्या होत्या आणि विशेष म्हणजे त्यांच्या विरोधात तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने उमेदवार दिला नव्हता. यंदाही याच मतदारसंघातून त्या निवडणूक लढवत आहेत. त्यांची बहिण, पंकजा मुंडे या सध्या राज्याच्या ग्रामविकास मंत्री आहेत. लोकनेते म्हणवल्या जाणारे वडिल गोपीनाथ मुंडे यांचा वारसा या दोन्ही भगिनी चालवत आहेत.