या वर्षीच्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकासाठी पाकिस्तान महिला संघाला खेळण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून (BCCI) बीसीसीआईने भारत सरकारकडे मागणी केली आहे. ही मालिका आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलच्या महिला चॅम्पियनशिपचा एक भाग आहे . भारत - पाकिस्तानच्या तणावपूर्ण वातावरणामुळे २०१२ म्हणजे ६ वर्षांपासून पुरुष क्रिकेट टीम मध्ये एकही सामना झाला नाही .
त्यामुळे या सामन्याला सरकार परवानगी देईल का हा प्रश्न (BCCI) बीसीसीआई समोर आहे. गेल्या वर्षी बीसीसीआयने पुरुष क्रिकेट कप संयुक्त अरब मध्ये खेळवला होता. २०२१ न्यूजीलैंड मध्ये होणाऱ्या सामन्यांनमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लैंड, भारत, न्यूजीलैंड, पाकिस्तान, साउथ अफ्रीका, श्रीलंका आणि वेस्टइंडीड ला आगामी अडीच वर्षात (BCCI) बीसीसीआई च्या अधिपत्याखाली खेळावे लागणार आहे.
(BCCI) बीसीसीआईच्या एका अधिकाऱ्याने असं सांगितले आहे की "जर सरकारने पाकिस्तान महिला टीमला अनुमती नाही दिल्यास दुसऱ्या पर्यायाचा अवलंब केला जाईल " असं (BCCI) बीसीसीआई अधिकाऱ्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.