महिला सक्षमीकरणासाठी बुरखाबंदी बरोबर घुंगटप्रथेवरही बंदी घालावी अशी भूमिका प्रसिद्ध गीतकार आणि विचारवंत जावेद अख्तर यांनी मांडली आहे. बुरखा बंदीवर आपला कोणताही आक्षेप नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. याआधी केंद्र सरकारने राजस्थानात होत असलेल्या ६ मेच्या मतदानापूर्वी घुंगट प्रथेवर देखील बंदी घालावी असे वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. या वक्तव्याचा दुरुपयोग केला गेला असल्याचे स्पष्टीकरण देत अख्तर यांनी दोन्हींवर बंदी घालण्याचे मत नोंदवले आहे.
" मला तर असे वाटते की बुरखाबंदीही व्हावी आणि घुंगटबंदीही व्हावी."
असे जावेद अख्तर यानी म्हटले होते. मात्र, आपला मुद्दा चुकीच्या पद्धतीने मांडल्याचे सांगत अख्तर यांनी आपले म्हणणे ट्विटद्वारे स्पष्ट केले.
https://twitter.com/Javedakhtarjadu/status/1124101421308293121