इस्लाम धर्माला पसंत नसलेल्या गोष्टी सलमान खान ने केल्या - तस्लीमा नसरीन
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेह हसीना यांच्या भेटीमुळे . या भेटीचे फोटो सलमानने सोशल मीडियावर शेअर केलेत. बांग्लादेश प्रीमियर लीग (BBPL) च्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान शेख हसीना यांच्यासोबत भेट झाली. या सोहळ्यात सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ दमदार परफॉर्मन्स दिला. त्यांच्या याच परफॉर्मन्सवर लेखिका तस्लीमा नसरीन यांनी टीका केली आहे. त्यांनी एक ट्विट करत सलमान खानचा एक फोटो शेअर करून या फोटोमध्ये सलमान खान अर्धनग्न महिला बॅक डान्सरसोबत दिसत आहे. यावर तस्लीमा नसरीन यांनी
https://twitter.com/taslimanasreen/status/1203931352703229952?s=20
'सलमान खान, कतरिना कैफ आणि अर्धनग्न महिला रूढीवादी मुस्लिम देश असलेल्या बांग्लादेशात कामूक गाण्यांवर नृत्य सादर केलं. प्रेक्षकांमध्ये बसलेल्या हिजाबी, बुर्केवाली, दाढीवाले मुल्ला हे पाहून अतिशय खूष होत होते. इस्लाम धर्माला पसंत नसलेल्या गोष्टी इथे केल्या जात आहेत.'
असं ट्विट केलं आहे.
https://www.instagram.com/p/B50dkrmlAqn/?utm_source=ig_web_button_share_sheet