औरंगाबाद शहरात राहणाऱ्या प्रिया राजपूत ने आयर्लंडच्या डब्लिन बिझनेस स्कूलच्या स्टुडंट युनियनमध्ये आंतरराष्ट्रीय अधिकारी म्हणून स्थान मिळवले आहे. हे स्थान मिळवणारी ती पहिली भारतीय महिला आहे. तिच्या या कामगिरीमुळे भारतीय महिला या भारतातच नव्हे तर जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात आपल्या कर्तृत्वाने देशाचे नाव रोषण करतात हे सिद्ध झालं आहे.
प्रिया राजपूत ही पत्रकारीकेमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत आसताना तिने परदेशात आपल्या भारतीय संस्कृतीवर प्रकाश टाकणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. तिच्या या प्रयत्नांमुळे विद्यापीठांकडून तिचे नेहमीच कौतुक केले जायचं.
डीबीएस मध्ये आंतराष्ट्रीय अधिकारी म्हणून निवड होणे हे परदेशी विद्यार्थ्यांसाठी फार सन्मानाची बाब आहे. अति परिश्रम तसंच मेहनती वृत्तीमूळे प्रियाला हे स्थान मिळाले आहे.