अहमदनगर जिल्ह्यात पती पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना पारनेर तालुक्यातील निघोज येथे घडली आहे. समाजातील दरी दूर होऊन एकजीव समाज निर्माण व्हावा यासाठी राज्य, केंद्र सरकार आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देते. मात्र, आंतरजातीय विवाह केलेल्या मुलीच्या काका आणि मामाने दोघांवरही पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्यांची घटना घडली आहे. या घटनेनंतर पती पत्नी दोघेही पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारा घेत होते, काल मुलगी रुख्मिणीचा दुर्दैवी अंत झाला. रुक्मिणी ही दोन महिन्याची गर्भवती होती.
नक्की काय झाले?
अहमदनगर जिल्ह्यातील निघोज येथे गवंडी व्यवसाय करणारे मंगेश रणसिंग दि. 1 मे रोजी त्यांची पत्नी रुक्मिणीला भेटण्यासाठी निघोज येथे वाघाचा वाडा येथे गेले होते. त्यापूर्वी या पती तत्नीचे स्वयंपाक करण्यावरून भांडणे झाले होते. म्हणून रुक्मिणी ही माहेरी निघून गेली होती. मंगेश रूक्मीणीला भेटण्यासाठी घरी गेल्यावर रुक्मिणीचे वडील रामा रामफल भरतिया, मामा घनशाम मोहन राणेंज, काका सुरेंद्रकुमार रामफल भरतिया या तिघांनी रूक्मीणीला मंगेश बरोबर न पाठवता त्याला मारहाण केली. यावेळी रूक्मीणी मात्र मंगेश बरोबर जाण्यास निघाली असता तिघांनी या पतीतत्नीला घरात कोंडून त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. व घराला कूलूप लावून निघून गेले. मात्र आरडाओरडा ऐकून शेजारच्या लोकांनी त्यांना बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. मंगेश व रुक्मिणी यांचे सहा महिन्यापूर्वी लग्न झाले होते. तिचे वडील काका आणि मामा यांचा लग्नाला विरोध होता.
जखमी मुलाचे नाव मंगेश रणसिंग असे आहे. या दोघांचा सहा महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला होता. हा विवाह रुक्मिणीच्या कुटुंबीयांना मान्य नव्हता. रागावलेल्या रुक्मिणीच्या कुटुंबीयांनी रुक्मिणी आणि मंगेशच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले.
या हल्ल्यात हे दोघेही गंभीर जखमी झाले होते, त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मंगेश जखमी आहे तर रुख्मिणीचा उपचारादरम्यान राञी मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी मंगेश आणि रुक्मिणी यांचा जबाब 4 तारखेला घेतलाय. पोलिसांना दिलेल्या जबाबात दोघांनी ही भयानक घटना सांगितली. पोलीसांनी मुलीचे मामा घनशाम राणेंज आणि काका सुरेंद्रकुमार भरतिया यांना ताब्यात घेतले असून रुक्मिणीचे वडील रामा रामफल भरतिया हा फरार झाला आहे.