महिला सर्वच क्षेत्रात पुढे आहेत. अशीच कामगिरी पुण्यातील रेणू शर्मा यांनी केली. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापकपदी रेणू शर्मा यांची निवड झाली. त्यामुळे पुणे रेल्वेच्या इतिहासात प्रथमच एक महिला व्यवस्थापकपदी निवड झाली.याआधी रेणू शर्मा या भारतीय रेल्वे कार्मिक सेवेच्या १९९० मधील तुकडीच्या अधिकारी होत्या. हैदराबाद येथील इंडियन स्कूल ऑफ बिझनेस त्याचप्रमाणे सिंगापूर आणि मलेशिया येथील प्रगत व्यवस्थापन प्रशिक्षणात सहभाग देखील घेतला होता.त्याचबरोबर प्रवाशांना अधिकाधिक चांगला सुविधा देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.