आंध्रप्रदेश प्रमाणेच महाराष्ट्रातही कायदा करावा यासाठी आज अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या आठव्या दिवशी भूमाता बिग्रेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी अण्णा हजारे यांची भेट घेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दोषींना लवकरात लवकर फाशी होण्यासाठी २० डिसेंबर पासून राळेगणसिद्धीत समाजसेवक अण्णा हजारे यांनी मौन व्रत सुरु केलं आहे. या आंदोलनाला तृप्ती देसाई यांनी पाठिंबा दर्शवत अण्णांबरोबर राज्यातील आणि महिला देशातील महिलांच्या सुरक्षिततेबाबत तसेच सरकारच्या असंवेदनशील ते बाबत आणि कडक कायद्याबाबत चर्चा करण्यात आली. याबरोबरच आंध्रप्रदेश मध्ये जसे दिशा बिल आले तसे महाराष्ट्रामध्ये श्रद्धा या नावाने बिल आणावे आणि तो कायदा मंजूर करावा अशी मागणी भुमाता ब्रिगेड अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी राळेगणसिद्धी येथे केली आहे.
https://youtu.be/wM3TXn9P1B8