कायदेशीर मार्गाने फाशी व्हायला हवी होती – अंजली दमानिया

Update: 2019-12-06 06:13 GMT

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना ठार करण्यात आलं असून हे ४ आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नांत असताना पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारले गेले आहेत. मात्र या प्रकरणानंतर आता उलट सुलट प्रतिक्रिया माध्यमांनवर येत आहे. वेगवेगळ्या प्रतिक्रिया समाजात उमटत असून काहीजण पोलिसांच्या कारवाईचं कौतुक करत आहेत यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यावर प्रतिक्रिया देताना चकमक करण्याची पद्धत चुकीची असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी ही प्रतिक्रिया ट्विटवरून दिली आहे.

“या घटनेनंतर द्विधा मनस्थिती आहे. बलात्कारी ठार झाल्याचा आनंद आहे, परंतु कायदेशीर मार्गाने फाशी व्हायला पाहिजे होती. चकमक करण्याची पद्धत चुकीची आहे”.

असं अजंली दमानिया यांनी म्हटलं आहे.

 

Similar News