महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडेयांनी मंगळवारी राज्यातील अंगणवाडी सेविकांना आणि मिनी अंगणवाडी सेविकांना निवृत्तीनंतर मानधनाच्या 50 टक्के निवृत्तीवेतनदेण्यात येईल अशी घोषणा केली आहे. दरम्यान यासंदर्भात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या शिष्टमंडळानेमंत्रालयात पंकजा मुंडे यांची भेट घेतली.
त्याचबरोबर केंद्राकडून जाहीर केलेली मानधनवाढ अंगणवाडी सेविकांना लवकरात लवकर मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मुंडे म्हणाल्या. या मदतीमुळे अंगणवाडी सेविकांना भविष्यासाठी फायदा होईल.