आगामी लोकसभा निवडणुकीत बीजू जनता दल 33 टक्के महिलांना तिकीट देणार असल्याची घोषणा ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी केली आहे. केंद्रपाडामध्ये झालेल्या एका सभेत त्यांनी याबाबतची घोषणा केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही घोषणा महत्त्वाची मानली जात आहे. याआधीही पटनायक यांनी महिलांना 33 टक्के आरक्षणाचे समर्थन केले होते. त्यामुळे त्यांची घोषणा महत्त्वाची मानली जात आहे. ओदिशामध्ये लोकसभेबरोबर विधानसभेच्याही निवडणुका होणार आहेत.
केंद्रपाडातील एका जाहीर सभेत त्यांनी ही घोषणा केली. महिलांना राजकारणात प्रतिनिधीत्व देण्यासाठी पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. याआधाही पटनायक यांनी लोकसभा आणि विधानसभेत 33 टक्के महिलांना आरक्षण देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. महिला सक्षम आहेत आणि राष्ट्र स्थापनेत त्या महत्त्वाचे योगदान देऊ शकतात, हे सिद्ध करण्यासाठी ओदिशाने पुढाकार घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ओदिशा विधानसभेचा कार्यकाल संपत असल्याने तेथे लोकसभेबरोबरच विधानसभेच्याही निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पटनायक यांची ही घोषणा महत्त्वाची मानली जात आहे.
बिजू जनता दला प्रमाणेच इतर पक्षांनी महिलांना प्रतिनिधित्व दिले तर ३३% आरक्षणाचा कायदा करण्याची गरज पडणार नाही तसेच महिलांना योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व मिळेल. बिजू जनता दलाचे अनुकरण इतर पक्ष करणार का? याचे उत्तर येत्या निवडणुकात स्पष्ट होईल.
दरम्यान देशभरातील महिला लोकप्रतिनिधींची सद्यस्थिती काय आहे जाणून घ्या मॅक्सवुमनच्या स्पेशल रिपोर्टमधून... खालील लिंकवर करा Click वाचा Quick