विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या 'अर्थसंकल्प सोप्या भाषेत' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी ‘आपल्याला मिळणारा पगार, पत्नीला मिळणारा पगार ही आपली आवक आहे. घरचा खर्च जावक आहे. माझ्यापेक्षा माझ्या पत्नीला मिळणारा पगार जास्त आहे. म्हणून तो मला लक्षात राहतो,' असी मिश्किल टिप्पणी केली होती.
या संदर्भात एबीपी माझा एका खाजगी वृत्तवाहिनीत अमृता फडणवीस यांना प्रश्न केला असता, अमृता फडणवीस यांनी देवेंद्र यांनी जे वक्तव्य केलं आहे. ते अगदी खरं आहे. देवेंद्र हे नेहमीच खरं बोलतात. त्यांना बोलावच लागतं. माझा पगार आता त्यांच्यापेक्षा जास्त आहे. त्यांना त्याचा अभिमान वाटतो याचा मला गर्व आहे.
हे ही वाचा...
- अमृता फडणवीसांना आवरा, अन्यथा देवेंद्र फडणवीस यांचे करियर खराब होईल, किशोर तिवारींचं आरएसएस ला पत्र
- मी सांगीतल्याने अमृता थांबत नाहीत देवेंद्र फडणवीसांनी केला पहिल्यांदाच गौप्यस्फोट
पत्नीचा पगार आपल्यापेक्षा जास्त असल्याचं त्यांना अजिबात वाईट वाटत नाही 'पुरुषांमध्ये जो इगो असतो तो देवेंद्रजींमध्ये नाहीय याचा मला आनंद आहे.' असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं.