अजित पवार यांनी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्यापुर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. यावर अमृता फडणवीस यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं. त्या एबीपी माझा या वृत्तवाहिनी वर झालेल्या एका मुलाखतीत बोलत होत्या.
सरकारस्थापनेच्या दरम्यान अनेक राजकीय घडामोडींनी सामान्य नागरिक भंडावून गेले होते. त्यापैकीच एक लक्षणीय घटना होती अजित पवार यांचं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पहाटे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणं. त्या क्षणांची आठवण अमृता फडणवीस यांनी करून दिली.
हे ही वाचा..
अमृता फडणवीस यांना जेव्हा राज्यातील नेत्यांबाबत विचारले तेव्हा त्यांनी अजित पवार यांच्या संदर्भात बोलताना "मला त्यांच्यासाठी खूप खुशी आहे. कारण काही दिवसांपुर्वीच ते भाजपाबरोबर उपमुख्यमंत्री झालेले होते. पण आता त्याचं प्रमोशन झालेलं आहे. ते आता प्रती Chief Minister झाले आहेत. त्यांना शुभकामना" असं म्हणत अमृता फडणवीस यांनी अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.