‘...तर असे प्रकार घडणं स्वाभावीक आहे’ अमरावतीतील घटनेवर नवनीत राणा यांची प्रतिक्रीया
कोरोना संक्रमित रूग्णाच्या संपर्कातील २४ वर्षीय तरुणीचा कोविड लॅबमध्ये गुप्तांगातील स्वॅब घेतल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्या नंतर सर्वच स्थरांतून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आपला संताप व्यक्त केला.
यावेळी बोलताना खासदार राणा म्हणाल्या की, ‘माझा प्रशासनाला प्रश्न आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला कॉंट्रॅक्ट बेसवर कामाला घेता तेव्हा त्या मागची पार्श्वभुमी तपासुन पाहाता का? त्या व्यक्तिची मानसिक स्थिती काय आहे, हे पाहाता का? नसेल तर असे प्रकार घडणं स्वाभावीक आहे. मी आज या भागाची खासदार त्यामुळे इथल्या महिला सुरक्षीत ठेवणं ही माझी जबाबदारी आहे.” असं राणा यांनी म्हटलं आहे.
पाहा काय म्हणाल्या नवनीत राणा...
https://youtu.be/k4DHEAUbGTg