राजस्थानातीलअलवर बलात्कार प्रकरणी पीडित महिलेची काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी भेट घेतली. याप्रकरणी आरोपींवर कारवाई होण्यासाठी त्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री गहलोत यांच्याशी चर्चा केली. आपण इथे राजकारणासाठी आलो नसून हा भावनिक मुद्दा आहे असे राहुल गांधी माध्यमांशी बोलताना म्हणाले. पीडितेच्या कुटुंबियांना भेटलो असून त्यांनी आमच्याकडे न्यायाची मागणी केली . आम्ही आरोपीवरती कारवाई करू याप्रकरणी राजस्थानचे मुख्यमंत्री गहलोत यांच्याशी चर्चा केल्याचं राहुल गांधी म्हणाले.
२६ एप्रिल २०१९ रोजी थानागाझी-अलवर बायपासवर ६ अज्ञातांनी पीडित महिलेच्या पतीला अडवून त्यांना दुसऱ्या ठिकाणी नेऊन पीडित महिलेवर तिच्या पतीसमोरच बलात्कार केला. यासंबंधी २ मे २०१९ रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता. आरोपींनी या घटनेची व्हिडिओ क्लीप ४ मे रोजी सोशल मीडियावर व्हायरल केली होती. दरम्यान ५ जणांसह व्हिडिओ चित्रीकरण करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
https://twitter.com/ANI/status/1128898628041547776