जगभरात कोरोना व्हायरसने घातलेल्या थैमानामुळे अनेक निरपराध जीव गेलेत, अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात. बॉलिवूडचे नेमके किती नुकसान झाले ह्याचे खरे आकडे तसे अजून हाती यायचे आहेत, कारण हे आस्मानी संकट अजून किती काळ असेल याची निश्चिती झाली नाही ! बॉलिवूडमध्ये तसा खऱ्या अर्थाने सन्नाटा पसरला आहे.. कुणी बोलण्याच्या मनःस्तिथीत देखील नाही..
बागी -३ हा चित्र पट ६ मार्च रोजी रिलीज झाला... ह्या सिनेमाला बम्पर ओपनिंग मिळाले . ह्या सिनेमाचा दिग्दर्शक अहमद खान म्हणाला, कोविद -१९ असतांनाही आमच्या 'बागी -३ ' ला १८ करोडचे ओपनिंग मिळाले.. जर 'कोरोना' समस्या नसती तर एव्हांना 'बागी -३ 'ने सहज १०० करोडचा टप्पा पार केला असता !
६ फेब्रुवारीला रिलीज झालेल्या 'थप्पड ' फिल्मने ३०. ६१ लाखाचा गल्ला मिळवलाय ..
त्यांनतर रिलीज झालेल्या 'अंग्रेजी मिडीयम ' ह्या फिल्म ला मात्र अपेक्षित यश लाभलं नाही . कारण तोपर्यंत कोरोनाने विळखा जगाला घातला होता ! ह्या फिल्मचे दिग्दर्शक होमी अदजानिया 'कोरोना ' साथ निवल्यावर हा सिनेमा रि-रिलीज करण्याच्या विचारात आहेत ! 'सध्या 'सूर्यवंशी ' ह्या मल्टी स्टारर फिल्मची रिलीज देत मात्र बेमुद्दत पुढे गेलीये !
कोरोना व्हायरसमुळे अचानक मिळालेल्या सुट्टीत मनोरंजन माध्यमातील सेलेब्रिटीजने त्यांच्या वेळेचं काय केलं ?
ज्या काळात मोबाईल फोन नव्हते अर्थात त्याही काळात पत्रकारिता चालतच होती मित्रांनो ! आज स्टार्सना गाठणं हे त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधून देखील शक्य नसतंच. कारण मोबाईल अटेंड करणं म्हणजे तुम्ही 'एव्हिलेबल ' आहात असा गैरसमज पसरू नये आणि आपलं स्टार स्टेटस कायम ठेवण्यासाठी देखील स्टार्सना त्यांच्या मोबाईलवर गाठणं सहज साध्य नाही. अर्थात काही स्टार्स टेक्स्ट मेसेज किंवा व्हाट्स अपवर मेसेज जरूर कळवतात.
कोरोना साथीमुळे अचानक दुनिया ठप्प झाली आणि त्याला आपलं बॉलिवूड -एंटरटेनमेंट इंडस्ट्री देखील अपवाद नव्हती ! ज्या फिल्मी हस्ती उपलब्ध झाल्यात, आणि त्यांचे ह्या 'कोरोना सुट्टी'तले उपक्रम समजलेत ते असे....
करीना कपूर खान -
गेले किमान १५ दिवस मी अक्षरशः घरीच आहे ! माझ्या घरापासून जवळच लोलो आणि मॉम राहतात पण त्यांच्याशी देखील त्यांच्या घरी जाऊन गाठभेट करू नये असं भीतीदायक वातावरण आहे सध्या ! मी असली कपूर पंजाबन म्हणजे आम्ही पिढ्यान पिढ्या खवय्ये असल्याने दररोज काहीतरी डेजर्ट घरी करायला सांगते. गाजर हलवा, कणकेचा भरपूर तूप -गूळ -केशर घालून केलेला शिरा मला आवड्तो आणि थोडा बहुत व्यायाम चालू आहे. मी आणि सैफ दोघंही एकाच घरी असण्याचा दुर्मिळ योग सध्या लेकाला, तैमूरला मिळालाय. त्याच्याशी खेळणं आणि खेळतांना आम्ही दोघांनी हरणं ह्यात तैमूरला खूप मजा येतेय. आणि हो, मी इंस्टाग्रामवर तशी लेट आलेय त्यामुळे अधूनमधून मी माझा वेळ इंस्टावर माझे फोटोज अपडेट करत असते.
कोरोना वादळ शमले की सर्व प्रथम करण जोहरच्या 'तख्त ' (फिल्म )चे शूटिंग सुरु होईल. पाहूया काय होतंय ते. नैसर्गिक आपत्तीसमोर आपण फार खुजे आहोत हे ह्या खेपेस प्रकर्षाने नियतीने दाखवून दिलंय ! सो वेट एन्ड वॉच पेशंटली ! '
सैफ अली खान -
आय एम एव्हिड रिडर ! म्हणूनच अचानक उद्भवलेल्या ह्या ग्लोबल इशूजपुढे गुढगे टेकण्यापेक्षा ह्या वेळेचा सदुपयोग करावा म्हणून माझ्या घरच्या लायब्ररीमधील सगळी वैचारिक - पुस्तकं वाचण्याचा मी सपाटा लावलाय. 'The Perils of Being Moderately Famous ' हे पुस्तक मी कालच वाचून हातावेगळं केलं. हे पुस्तक माझी बहीण सोहाने लिहिलं आहे जे तिने लिहून ३ वर्षे झालीत. प्रत्येक वेळी ती मला रागे भरते, भाई आप मेरी बुक कब पढोगे ? पण वेळेअभावी हे जमून आलं नाही. जे आता मी वाचून काढलं आणि सोहाला फोन करून बधाई दिली. सध्या माझ्या फिल्मचं शूटिंग कधी सुरु होईल ह्याचे प्लॅनिंग दिनेश विजन (निर्माता )काढून आलं नाही, सगळेच ह्यातून सावरण्याची वाट पाहत आहेत .
शाहरुख खान -
माझा दररोजचा वेळ सकाळी उशिरा सुरु होतो कारण मी रात्री लेट म्हणजे पहाटे चार कधी तीनला झोपत असतो. त्यामुळे करोना मुळे ह्या मिळालेल्या वेळेचा अधिकाधिक उपयोग मी स्क्रिप्ट वाचण्यासाठी करतोय. माझ्याकडे किमान २०-२२ पटकथा तयार आहेत. ज्या वाचून त्या फिल्म्स करायच्या किंवा नाहीत हा निर्णय मी गेली २ वर्षे घेऊ शकलो नव्हतो जो आता घेईन. गौरीसोबत मी बॅडमिंटन खेळतोय . अबराम (मुलगा वय वर्षे ६ ) सोबत पतंग उडवण्यापासून कॅरम खेळण्यापर्यंत आम्ही छान एन्जॉय करतोय. माझ्या स्वतःच्या २ फिल्सचे शूटिंग सुरु व्हायचे होते. अंतराळवीर राकेश शर्माच्या बायोपिकचे काम सुरु करायचे होते. पण सध्या शूटिंगच्या तारखा निश्चित व्हायच्या आहेत . ग्लोबल समस्या जेंव्हा आपल्या आरोग्याशी निगडित असतात तेंव्हा आपण हतबल असतो !
करण जोहर -
करीना (कपूर )माझी आवडती अभिनेत्री . कभी ख़ुशी कभी गम नंतर तिच्यासोबत काम करण्याचा योग जुळून आला नाही, माझ्या निर्मितीत हल्लीच 'गुड न्यूज ' हा सिनेमा रिलीज झाला ज्याचा मी दिग्दर्शक नव्हतो ! माझ्यावर बेबो अनेकदा रागावली देखील ! आम्ही दोघेही 'तख्त ' ह्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होतो .. कारण ह्या फिल्मची स्टारकास्ट खूप मोठी आहे. बेबो, भूमी (पेडणेकर ), रणवीर सिंग , विकी कौशल, आलिया भट्ट, अनिल कपूर अशी तगडी स्टार कास्ट असल्यावर फिल्म वेळेत पूर्ण करणे आणि ती ओव्हर बजेट होऊ न देणे अशी अनेक आव्हानं असतात , तख्त ही फिल्म आधीच दीड वर्षे उशिरा सुरु झालीये ! विकी कौशल , रणवीर सिंग ,आणि आलिया भट्ट हे तीघं अतिशय बिझी आहेत , सगळ्यांच्या डेट्स मॅच होताना नाकीनऊ आलेत , आणि त्यात शूटिंग सुरु झालं आणि बंद करावं लागलं ! कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती आहे आणि सर सलामत तो पगडी पचास ह्यावर आमच्या धर्मा प्रोडक्शन्सचा विश्वास आहे। एडिटिंग ,डबिंग , प्री -आणि पोस्ट प्रोडक्शन सगळी कामं पूर्णतः बंद केलीयत . ह्या सुट्ट्यांच्या कालावधीत कुणाचाही पगार कमी केला जाणार नाही !
अभिनेत्री तापसी पन्नू -
मी गेले १५ दिवस घरीच आहे . माझ्या बहिणीची सोबत ही मला खास मैत्रिणीच्या सोबतीपेक्षा अधिकच प्रिय आहे . आम्ही दोघी मिळून वर्क आऊट देखील घरीच करतोय . प्राणायाम करण्यावर जोर देतोय . येथेच पंजाबी जेवणार दोघी ताव मारतोय . मुख्य म्हणजे मी अशी झोपतेय की पूर्वी कधीही झोपले नव्हते ! अर्थात दिवसाचे १६-१८ तास शुटिंग्स , तयारी ,मेकअप , सेटवर पोहचण्यासाठी लागणार वेळ ह्यामुळे झोप अपूरी होते , जी मी आता काढतेय . माझ्यासाठी हा रिफ्रेशिंग ब्रेक आहे ! आतापर्यंत मी आणि शगूनने (बहीण ) १२ फिल्म्स बघितल्या आहेत . आमची लिस्ट मोठी आहे , त्यात काही वेब सिरींजची भर पडलीये . आरोग्याची काळजी देखील घेतोय आम्ही . '
दीपिका पदुकोण-
मैने अपने घर के वॉर्डरोब को सलिके से लगाया . . हे काम करण्यात माझे दोन दिवस गेलेत . लग्न झाल्यापासून मला माझ्या वॉर्ड रोबकडे लक्ष देण्यास वेळच मिळाला नव्हता . रणवीरला सिंधी फूड आवडते . ते देखील शिकण्याचा मी प्रयत्न करतेय. छपाक ' फिल्मनंतर माझे नव्या फिल्मचे शूटिंग सुरु झाले नव्हते ..पण आई वडिलांना मी मुंबईत मिस करतेय. ते बेंगलोरला आहेत ! एक्सरसाइज , योगा , नव्या स्क्रिप्ट्स वाचणे , रोजचे पेपर्स वाचणे ह्यात दिवसाचा वेळ कमी पडतोय ! मनापासून प्रार्थना करतेय , हे जग पुन्हा पहिल्यासारखं लवकरच होऊ दे !
रणवीर सिंग -
मी कपिलदेवची भूमिका (बायोपिक ) करत असलेला '८३ ' हा सिनेमा शूटिंग होऊन संपला .. डबिंग -प्रमोशन बाकी होते ..परंतु सगळ्याच फिल्मच्या रिलीज डेट्स आता बेमुद्दत पुढे गेल्या आहेत , त्यामुळे काहीही नक्की नाहीये .. मला आणि दीपिकाला एकत्र वेळ घालवण्याची ही संधी आहे असं म्हणेन मी . अर्थात ह्या ग्लोबल इशूजचा सगळ्यांनी धीराने सामना करणं इतकंच आपल्या हातात आहे !
कुणाल खेमू -
फिल्म्स, किंवा वेब शोज यांच्या शुटिंग्स सतत चालूच असतात . मुख्य म्हणजे टीव्ही , फिल्म , वेब कलाकार असो शुटिंग्स प्रत्यक्ष ७-८ तास चालतं परंतु त्यासाठी किंवा ती भूमिका पार पाडण्यासाठीची तयारी खूप आरंभीपासून चालते . त्या भूमिकेत शिरण्यासाठी म्हणून जो परकाया प्रवेश करायचा असतो ती मानसिक प्रोसेस मोठी असते . समजा त्या व्यक्तिरेखेला जर दाढी असेल तर दाढी लावणे टिंब तत्सम तयारी ही तयारी वरवरची त्यासाठी देखील वेळ जातोच . असो बहुतेक कलाकार अशा मानसिक आणि शारीरिक प्रोसेसमधून भूमिकेपर्यंत जातात .त्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो . आऊट डोअर शुटिंग्समध्ये प्रवास असतोच . अशा अनेक कारणांनी कुटुंबासाठी फार अल्प वेळ देणे शक्य होते .मी गेले १५ दिवस पूर्णतः घरीच आहे . माझा आणि सोहाचा (पत्नी सोहा अली खान ) वेळ इनाया नवमी (मुलगी वय ३ वर्षे )साठी दिलाय . सध्या जिम देखील पूर्ण बंद आहेत ,त्यामुळे मी घरातच व्यायाम -योगासनं करतो आणि मला व्यायाम करताना पाहून लेक देखील व्यायाम करू लागते . मी जेंव्हा सूर्यनमस्कार घालतो तेंव्हा तिचे सफाईदार सूर्यनमस्कार पाहून तिचे व्हिडिओज घेण्याचा मोह सोहाला आवरत नाही ! लेकीला लपाछपी खेळणे खूप आवडते , मग काय आम्ही दिवसभर लपाछपी खेळतो . झालंच शक्य तर पूर्वी बघायचे राहून गेलेले सिनेमे देखील पाहतो .
अभिनेत्री बिपाशा बसू -
खरं म्हणजे कोरोना-समस्येने अक्ख्या जगाला ग्रासलंय आणि त्यासाठी परिस्थितीला शरण जाऊन घरच्या घरी वेळ वेळेचा सदुपयोग करणं केंव्हाही योग्यच . मी आणि माझा अभिनेता नवरा करण सिंग ग्रोव्हर आम्ही दोघंही फिटनेस फ्रेक आहोत ,त्यामुळे करण जिममध्ये किमान दोन तास दररोज वेळ देतो तर मी फिटनेससाठी डान्स करते . आमच्या फ्लॅटमध्ये च आम्ही घरी जिम इक्वीपमनेट्स ठेवली आहेत त्यामुळे आम्हांला कुठेही बाहेर जाऊन एक्सरसाइज करण्याची गरज भासत नाही . फ्लॅटला मोठे टेरेस आहे त्यामुळे ह्या टेरेसवरच आम्ही पहाटे किंवा संध्याकाळी एकत्र वॉक घेतोय . स्वतःची इम्युनिटी वाढवण्यासाठी फिटनेस -व्यायाम करणं आवश्यक आहे . गेले १० दिवस मी फिटनेस ट्रेनरकडून स्ट्रेंग्थ ट्रेनिंगचा व्हिडिओ मागवून घेतलाय आणि शारीरिक मजबूती -रोग प्रतिकारक शक्ती कशी वाढवावी याचे धडे घेतेय .फिटनेस खेरीज बंगाली डेलिकसीज घरी देखील करतेय ज्यात मी पूर्वी कधी स्वतःला आजमावून पाहिलं नाही !
करण सिंग ग्रोवर -
कोरोना व्हायरस सुट्ट्यांमुळे माझ्या रुटीनमध्ये तसा फारसा फरक पडला नाही ! बिपाशाने पूर्वी घर घेतलं तेंव्हा घरातच जिम करावी असा हट्ट धरला तेंव्हा मला तिचे म्हणणे पटले नाही , उगाच जागा व्यापते असं मला वाटत होतं ! तिने किती योग्य निर्णय घेतला होता असं आता वाटतंय . कोरोना इफेक्त्त ही वैश्विक आरोग्य समस्या आहे , ह्यातून फिल्म इंडस्ट्रीच काय पण जगाला बाहेर पडण्यासाठी आणखी महिना किंवा दोन महिने लागतीलही . ह्या सगळ्यांचा मानसिक ताण येतोच . मी पूर्वीपासून डि-स्ट्रेस होण्यासाठी पेंटिंग करत असे , आजही करतोय . मॉडर्न आर्ट -ऍब्स्ट्रॅकट करत असतो . फरक इतकाच की आज कोरोनामुळे हाती अचानक वेळ गवसला आहे ! माझी लवकरच एक वेब सिरीज सुरु होईल परंतु त्या तारखा ठरल्या नाहीत ! किपींग माय फिंगर्स क्रॉस्ड !