अल्का याज्ञिक यांचा जन्म २० मार्च १९६६ मध्ये कोलकत्यात झालं. बॉलिवूडमध्ये लोकप्रिय गायिका म्हणून त्यांची ओळख आहे. सुमारे ३ दशके त्यांनी बॉलिवूडमध्ये यशस्वीरित्या काम केलं. अल्का याज्ञिक या भारतामधील सर्वात यशस्वी पार्श्वगायिकांपैकी एक आहेत. त्यांच्या या कामगारीबद्दल त्यांना फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कारासाठी विक्रमी ३५ नामांकने व एकूण ७ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. त्याचबरोबर त्यांना दोनवेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील जाहीर करण्यात आला. वयाच्या ६व्या वर्षापासून शास्त्रीय गायनाचे धडे घ्यायला त्यांनी सुरवात केली. वयाच्या दहाव्या वर्षी त्या मुंबईमध्ये आल्या त्यांनी १९८० ला लावारीस या हिंदी चित्रपटामध्ये त्यांनी गायलेले गाणे गाजले होते. मात्र त्यांना खरी प्रसिद्धी माधुरी दीक्षित यांचा चित्रपटातील एक दो तीन या गाण्यामुळे मिळाली.
या गाणयासाठी त्यांना पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांनी १९९० व २००० च्या दशकांमध्ये गायलेली अनेक गाणी लोकप्रिय झाली. त्यांनी आतापर्यंत एकूण १,११४ हिंदी चित्रपटांमध्ये २,४८२ गाणी गायली आहेत. सर्वाधिक गाणी म्हटणाऱ्या बॉलिवूड गायकांमध्ये आशा भोसले, लता मंगेशकर, महम्मद रफी व किशोर कुमार यांच्यानंतर त्यांचा पाचवा क्रमांक लागतो. अल्का याज्ञिक यांनी हिंदी गाण्यांबरोबर गुजराती, अवधी, उडिया, आसामी, मणिपुरी, नेपाळी, राजस्थानी, बंगाली, भोजपुरी, पंजाबी, मराठी, तेलुगू, तमिळ, मल्याळी व इंग्लिश इ भाषांमध्ये गाणी गायली आहेत.
https://youtu.be/SrnbXgOlVLw