Teesta Setalvad tutoring Shaheen Bagh protestors on what questions to ask the interlocutors, appointed by the Supreme Court... See how organic and spontaneous this movement is?
नागरिकता संशोधन कायद्याविरूद्ध दिल्लीच्या शाहीनबागमध्ये गेल्या २ महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. या विषयात चर्चा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्त नेमले आहेत. त्यांनी काल शाहीनबागमध्ये जाऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. या समितीमध्ये सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील संजय हेगडे, साधना रामचंद्रन यांचा समावेश आहे.
यावेळी आंदोलनात सहभागी असलेल्या दोन मुलींनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ‘न्यूज २४’ ने दिलेल्या वृत्तानुसार, या मुलींनी सर्वोच्च न्यायालयाच्या मध्यस्तांच्या समितीशी चर्चा करताना असे मुद्दे समोर ठेवले ज्यामुळे ते ही प्रभावित झाले.
फातिमा आणि झैनब अशी या मुलींची नावं आहेत. यापैकी फातिमा ही जामिया विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे तर झैनब ‘इग्नू’मधून शिक्षण घेत आहे.
आम्ही फक्त सत्य सांगत आहोत तर आम्हाला दहशतवादी म्हटलं जातंय, महिला असून सन्मान दिला जात नाही अशी खंत फातिमानं व्यक्त केली. एकीकडे पंतप्रधान म्हणतात की, देशात डिटेन्शन कॅम्प नाहीत आणि अशा कॅम्पमधून लोकांचे मृत्यू होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. नागरिकत्व संशोधन कायदा हा महिलांविरोधी, गरिबांविरोधी देशाच्याविरोधात आहे असं फातिमाचं म्हणणं आहे. आम्ही फक्त आमचं म्हणणं मांडायला इथे बसलो आहोत, मात्र कोणालाच आमचं ऐकायचं नाहीय. आपल्या देशात धार्मिकतेवर नागरिकत्व देण्याचा संविधानात आहे का, असा सवालही तिने उपस्थित केला.
आमचं दुख खरं आहे म्हणूनच ते ऐकून समितीमधील सदस्य भावनिक झाले असं झैनबने म्हटलं. प्रसारमाध्यमांनी आमचा आवाज दाबला आणि चुकीच्या पद्धतीने रिपोर्टींग केलं असा आरोप झैनबने केला.
https://youtu.be/HlGkxccsBmo?t=5
“आमच्यावर असा आरोप होतोय की, शाहीनबागमध्ये आम्ही रस्ता अडवून ठेवला आहे. ज्यामुळे दिल्लीकरांना त्रास होतोय आणि दुसऱ्या मार्गाने जावं लागतंय. मोठ्या प्रमाणात ट्राफिक जॅम होतोय. मात्र, त्यांना सांगायचंय की, आम्ही दोन महिन्यांपासून कडाक्याच्या थंडीमध्ये आंदोलन करत आहोत. हे आंदोलन संविधानाची मूल्य वाचवण्यासाठी केलं जातंय आणि कोणताही ट्राफिक जॅम संविध्याच्या मुल्यांपेक्षा मोठा असू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास असून न्यायालय जो निर्णय घेईल तो मान्य असेल” असं झैनब ‘न्यूज २४’च्या वार्ताहाराशी बोलताना म्हणाली.
भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी या आंदोलनावर पुन्हा एकदा आक्षेप घेतलाय. सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने काल (दि. १९) रोजी शाहीनबागमध्ये जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्याआधी १८ तारखेला त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड आंदोलकांना सूचना देत आहेत.
या व्हिडीओमध्ये एक मुलगी उपस्थित आंदोलकांना सर्वोच्च न्यायालयाच्या समितीपुढे ठेवायचे प्रश्न समजावून सांगत आहे आणि त्याचं उत्तर न देण्यासंदर्भातही सूचना देत आहे. त्यासाठी तिस्ता सेटलवाड तिला मदत करत आहेत.
“सर्वोच्च न्यायालयाच्या समितीसोबत चर्चा करणाऱ्यांना अशाप्रकारे प्रश्न सांगितले जात असतील तर हे आंदोलन किती खरं आणि उत्फूर्त आहे?” असा सवाल अमित मालवीय यांनी केलाय.