प्रक्रिया पूर्ण झालेल्या पोलिस भरती उमेदवारांनी घेतली मंत्री यशोमती ठाकूर यांची भेट

Update: 2020-09-07 09:37 GMT

महाराष्ट्रात (maharashtra) २०१८ मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे पोलिस (Police) रिक्त पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्यापैकी ३५८७ जागेसाठी उमेदवारांनी अर्ज केले. अर्ज केलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा घेऊन निवड प्रक्रिया पार पडली असून त्यातून समान गुण मिळून त्यांचे नाव प्रतिक्षा यादीत आले आहे. तसेच उमेदवारांच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करून मुळ कागदपत्रे जमा करून घेतली आहेत.

 

तसेच उमेदवारांना जिल्ह्याच्या निवड प्रक्रियेनुसार समान गुण मिळूनही कमी वयमर्यादेतील प्रतिक्षा यादीत ठेवले आहे. पण त्यानंतर कोणतीही भरती झालेली नाही. तसेच या उमेदवारांचे भरती होण्याचे वयही वाढत असल्याने शासनाने योग्य मार्ग काढून आम्हांला सेवेत सामावून घेण्याचा योग्य विचार कारावा. एवढीच उमेदवारांची मागणी आहे. या मागणीचे निवेदन आज उमेदवारांनी महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर (Adv. Yashomati Thakur) यांना दिले.

 

 

Full View

 

Similar News