न्यायालयाने बजावले कंगना राणावतला समन्स

Update: 2019-06-26 05:22 GMT

बॉलीवूड अभिनेता आदित्य पांचोली यांनी बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत व तिची बहीण रंगोली चांडेला विरुद्ध २०१७ मध्ये बदनामीचा दावा दाखल केला होता. यासंदर्भात दाखल केलेल्या बदनामी प्रकरणी दंडाधिकारी न्यायालयाने मंगळवारी समन्स बजावले. कंगना राणावत ही गेली कित्येक वर्ष आपल्याला बदनाम करत असून तिने एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आदित्य पांचोली, त्याची पत्नी झरीना वहाब, मुलगा सूरज पांचोली यांच्यावर टीका केली होती तर कंगनाची बहीण रंगोली हिनेही टिष्ट्वटरद्वारे आदित्यवर अनेकदा टीका केली आहे. त्यामुळे या दोघींनी लेखी माफी मागावी, अशी मागणी दाव्यात केली आहे. दरम्यान पुढील सुनावणी २६ जुलै रोजी आहे.

Similar News