वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री केतकी चितळे हिने पुन्हा एकदा राजकीय वादावर टिपन्नी करताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य केलं आहे. पत्रकर अर्णब गोस्वामी यांना पाठींबा देताना संबध नसतानाही कोरोनाशी लढत असलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर दहशत निर्माण करत असल्याची टीका केतकीने फेसबुक च्या माध्यमातून केली आहे. सोबतच, भाजपचा अजेंडा राबवताना ‘काँग्रेस मुक्त भारत’ हा नाराही केतकीने लावला आहे.
रिपब्लीक भारत वृत्तसंस्थेचे पत्रकार अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने काँग्रेस पक्ष आणि राज्याचे गृहनिर्णाण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर दहशत निर्माण करत असल्याची अप्रत्यक्ष टीका केली आहे. सोबतच, आता “पत्रकारावर हमला केल्यावर तो पत्रकार (अर्णब गोस्वामी) पेटून उठतो.” असं केतकीने म्हटलंय.
संबंधित बातमी...
- जितेंद्र आव्हाडांच्या मुलीसंबंधित खोटी बातमी लावणाऱ्या आणखी एका चॅनेलला दणका
- तरुणास मारहाणीवर जितेंद्र आव्हाडांची अप्रत्यक्ष कबुली
पालघर मध्ये जमावाने केलेल्या दोन साधुंसह तीन जणांच्या हत्येप्रकरणात कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया यांच्यावर पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी टीका केली होती. यानंतर त्यांच्यावर आपल्या पत्नीसह रात्री घरी जात असताना दोन काँग्रेस कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आल्यांचं अर्णब यांनी सांगितलं.
- जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावर तरुणास मारहाण, रुपाली चाकणकर म्हणतात
- 'या' हरामखोरांवर जोर दाखवा; चित्रा वाघ यांचं जितेंद्र आव्हाडांना चेलेंज
यावर केतकीने “बंदूकीच्या जोरावर जमीन हडपण्याचे दिवस गेले. आता बंगल्यावर बोलवून मारल्यावर ते सर्वांसमोर लगेच येतं. पत्रकारावर हमला केल्यावर तो पत्रकार (अर्णब गोस्वामी) पेटून उठतो.” अशी पोस्ट आपल्या फेसबुकवर अकाऊंटवर लिहली आहे.
पालघर मध्ये दोन साधुंसहीत तीन जणांना जमावाने मारहाण करुन हत्या केल्याप्रकरणी देशभरातील वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरुन रिपब्लीक भारत वृत्तसंस्थेचे पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी चर्चेदरम्यान कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर टीका करण्यावरुन शाइफेक करण्यात आली. या घटनेची माहिती पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी दिली होती. दोन हल्लेखोरांना अर्णब यांच्या सुरक्षा रक्षकांनी पकडून ना.म. जोशी पोलिस स्थानकात पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे.